Virendra Sehwag And Wife Aarti Video : भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि त्याची पत्नी आरती अहवालत (Aarti Ahlawat) हे दोघे जवळपास 20 वर्ष एकत्र संसार केल्यावर एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून वीरेंद्र आणि त्याची पत्नी आरती यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र अद्याप याबाबत क्रिकेटरने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात वीरेंद्र सेहवाग आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखायला जायचा. सेहवागने त्याची गर्लफ्रेंड आरती हिच्याशी प्रेमविवाह केला. 2004 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले. सेहवाग आणि पत्नी आरती यांनी 2007 साली मुलगा आर्यवीर याला जन्म दिला. त्यानंतर धाकटा मुलगा वेदांतचा जन्म 2010 साली झाला. जवळपास दोन दशकांहून अधिक काळापासून एकत्र असतानाही मागील काही काळापासून दोघांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाले असून दोघे एकमेकांपासून दूरावले आहेत. विरेंद्र सेहवागने दिवाळीमध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याची दोन्ही मुलं आणि आईबरोबर दिसला. मात्र या फोटोंमध्ये आरती दिसली नव्हती किंवा तिचा उल्लेखही केला नव्हता. तेव्हाच चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. चाहत्यांमध्ये चर्चा असतानाही दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नसल्याने दोघे लवकरच घटस्फोट घेणार असं अनेक वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
सेहवाग आणि आरती यांच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरू लागली असताना या दोघांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका कार्यक्रमावरून घरी जाताना सेहवाग आणि त्याची पत्नी गाडीमध्ये बसलेले दिसतात. व्हिडीओमध्ये आरती सेहवागवर खूप वैतागलेली दिसते आणि दोघे देखील एकमेकांशी चिडून काहीतरी बोलताना दिसतायत. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत. हे सगळं प्रकरण इथूनच सुरु झालं असल्याचे लिहिले.
हेही वाचा : 13 वर्षांनी विराट कोहली खेळणार रणजी ट्रॉफी मॅच, फ्री मध्ये कुठे पाहू शकता Live?
सेहवाग आणि आरती हे 2000 सालाच्या आसपास एकमेकांच्या प्रेमात पडले. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या घरी झालेल्या आलिशान लग्न सोहळ्यामध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. अनेक वर्षांपासून आरती खंबीरपणे सेहवागच्या पाठीशी उभी राहिली. मात्र आता दोघांमधील दुरावा नजरेत भरेल इतका वाढला आहे. त्यामुळेच ते लवकरच विभक्त होण्याची घोषणा करतील असं निकटवर्तीय सुत्रांनी सांगितलं आहे. सेहवाग हा 2015 साली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सेहवाग सध्या स्वत:ची क्रिकेट अकादमी चालवतो.