मुंबई : 'इंडियन रेल्वे केटरिंग एन्ड टुरिझम कॉर्पोरेशन' (IRCTC) चं भारतीय श्रद्धाळुंसाठी चारधाम यात्रेचं आयोजन केलं आहे. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथ पुरी आणि रामेश्वरम या भक्तीधामांचा चारधाम यात्रेत समावेश होतो. 'आयआरसीटीसी'नं 'उत्तराखंड चारधाम यात्रा' (पॅकेज कोड - WZTT06) या नावानं भाविकांसाठी एका पॅकेज उपलब्ध करून दिलंय. या पॅकेजमध्ये केवळ ४३५,२५० रुपयांत भाविकांना चारधाम यात्रा पूर्ण करता येईल. पुणे, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा या स्थानकांपासून (बोर्डिंग पॉईंट) भाविक या यात्रेत सहभागी होऊ शकतात.
१३ रात्री / १४ दिवसांत ही यात्रा पूर्ण होईल. सिंगल ऑक्युपसी आणि ट्विन शेअरिंगमध्येही तुम्हाला यात्रेत सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. टूर गाईडसहीत एसी ट्रेनचा प्रवास, एसी हॉटेलमध्ये राहण्याची सोय, रस्ते वाहतुकीत एसी टुरिस्ट बसचा प्रवास, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या सोई-सुविधा या पॅकेजमध्ये उपलब्ध असतील.
३ जून २०१९ ते १६ जून २०१९ पर्यंत या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान बारकोट, बद्रीनाथ, गंगोत्री हरिद्वार, केदारनाथ, सितापूर, उत्तरकाशी, यमनोत्री या स्थळांना भेट देता येणार आहे.
अधिक माहितीसाठी भाविक IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.