अंतराळात ISRO ची आणखी एक यशस्वी झेप

ISRO च्या सिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

अंतराळात ISRO ची आणखी एक यशस्वी झेप title=

नवी दिल्ली : ISRO च्या नेविगेशन, सॅटेलाइटचे गुरूवारी 12 एप्रिलला सकाळी 4 वाजून 4 मिनिटावर पीएसएलवी - सी 41 च्या मार्फत श्रीहरिकोटातून प्रक्षेपित झाले आहे. आणि आपल्या कक्षेत हे यान यशस्वी स्थापित झालं आहे. पीएसएलवी - सी 41 आणि आयआरएनएसएस -1 आयचे प्रक्षेपण सतीश धवन या आंतराळ केंद्राच्या पहिल्या पॅडवरून लाँच करण्यात आलं. सतीश धवन या अंतराळ केंद्रातून सोडल्यानंतर 19 मिनिटांत याने आपली जागा निर्माण केली. 

इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी मिशन सफल झाल्याच सांगितल आणि यासंदर्भातील वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटलं की, आयआरएनएसएस - 1 आय याचे यशस्वीरित्या प्रेक्षपण झालं असून ते आपल्या कक्षेत स्थापित झालं आहे. आयआरएनएसएस - 1 आय सात नेविगेशन सॅटेलाइटमधून आयआरएनएसएस - 1 ए ने जागा घेतली आहे. जवळपास 2420 करोड रुपयातून हे नेविगेशन सॅटेलाईटच्या मदतीने नकाशा बनवण्यास मदत होणार आहे.