मुंबई : आता धूम्रपानास बाय बाय करणं आता आणखी सुलभ होणार आहे. या कामात मोदी सरकार मदत करणार आहे. कारण १ सप्टेंबर म्हणजेच आजपासून सिगारेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एप्रिल महिन्यात नव्या नियमांची घोषणा केली होती. या नियमांत मोठे बदल करण्यात आले होते. या नियमानुसार सिगारेटच्या पाकिटावर धूम्रपान टाळा किंवा क्विट स्मोकिंग अशा संदेशासह हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे.
१८००-११-२३५६ असा हा हेल्पलाईन नंबर असून यावर फोन करुन तुम्ही धूम्रपान सोडण्याबाबत मदत घेऊ शकता. या हेल्पलाईनवरुन तज्ज्ञ मंडळी तुम्हाला धूम्रपान सोडण्याबाबत समुपदेशन आणि मार्गदर्शन करतील. अनेक दिवसांपासून ज्यांना धूम्रपान सोडायचंय त्यांना या हेल्पलाईनचा फायदा होऊ शकतो.