मुंबई : इवांका ट्रम्प सध्या भारत दौर्यावर आली आहे. हैदराबादमध्ये 'जागतिक उद्योजक परिषदे'मध्ये तिनं सहभाग घेतला आहे.
इवांका हैदराबादमध्ये असल्याने तिच्या सुरक्षेसाठी, प्रवासासाठी आणि वास्तव्यासाठी खास सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
इवांका ज्या परिसरात आहे. तेथील भागात स्वच्छता ठेवण्यात आली आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.
@IvankaTrump Please Come on our Roads, if you are, our Government will immediately repair our Roads #Marredpally @Paul_Oommen @umasudhir @tweetsakshi @krishna0302 @Iamtssudhir @Ashi_IndiaToday @DeccanChronicle @timesofindia pic.twitter.com/hK6PucNpYM
— krishank (@krishank9) November 27, 2017
इवांकाच्या येण्याने हा बदल अवघ्या काही दिवसांत करण्यात आल्याने स्थानिकांनी यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अनेकांनी ट्विटरवर याबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. काहींनी थेट इवांकाला त्याच्या परिसरात भेट देण्याची विनंती केली आहे.
Ivanka Trump please do visit hyderabad frequently and do visit all the areas so that all the roads in the city will be beautified and the beggars will be provided with proper shelter.
— Lets Welcome Life! (@kalyanprasad) November 22, 2017
एका स्थानिक नेत्याने ट्विटा करताना लिहलंय की सध्या हैदराबादमध्ये दोन प्रकारचे रस्ते आहेत. एक तर 'इवांका ट्रम्प रोड' तर दुसरा 'सामान्य रोड' आहे. यावरून तुम्ही इवांकासाठी किती प्रमाणात सुरक्षा आणि स्वच्च्छता वाढवली असेल याचा विचार करू शकता.