मुंबई : सध्या कर्नाटकचं रजिस्ट्रेशन असणारी एक हिरव्या रंगाची बस सोशल मीडियावर वायरल होताना दिसतेय... त्याचं कारण म्हणजे या बसवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा असलेला फोटो...
पहिल्यांदा या बसचा फोटो शेअर झाला निरज कामथ या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून... आणि थोड्याच वेळात हा फोटो १००० हून अधिक वेळा शेअर झाला... वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून...
भारताच्या बसवर जिनांचा फोटो कशासाठी? 'जिना' यांचा फोटो असलेली ही बस बंगळुरूमध्ये दिसतेच कशी? कर्नाटक दुसरं केरळ बनतंय का? ते जिनांचा फोटो बसवर लावणाऱ्या मालकाला बसमध्ये घालून ती बस पेटवून द्या... अशा हिंसक कमेंटसहीत हा फोटो सोशल मीडियावर फिरू लागला... त्यामुळे तणावही वाढू लागला. परंतु, यामागचं सत्य मात्र वेगळंच होतं.
Bus With Muhammad Ali Jinnah's Photo In Bengaluru @CPBlr @narendramodi @HMOIndia @CMofKarnataka @KirenRijiju @PTI_News @republic @TimesNow pic.twitter.com/gAYPE8naEq
— Neeraj Kamath C (@kamathneeraj) July 13, 2017
जिनांचा फोटो असलेली या बसचा फोटो खोटा किंवा एडिट केलेला नाही... तर ही बस खरोखरच बंगळुरूच्या होसुरू रोडवर पाहिली गेली होती. परंतु, या बसचा वापर एका मल्याळम सिनेमाच्या शूटिंगसाठी सुरू होता. होसुरू रोडवरून या बसचा प्रवास हादेखील शुटिंगचाच एक भाग होता.