मुंबई : शाळा आणि कॉलेजच्या हद्दीत जंक फूडवर बंदी घालण्याचा निर्णय युजीसीने घेतला आहे. त्यामुळे आता शाळा आणि कॉलेजच्या कँटीनमध्ये बिस्किटे, चॉकलेट, नूडल्स, पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड आता मिळणार नाही आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशभरात शाळांच्या पाचशे मीटरच्या परिसरात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड विकण्यावर बंदी घालण्याची तयारी सुरु होती. FSSAI ही केंद्रीय संस्था सध्या अशा जंक फुड वर्गातल्या पदार्थांची यादी तयार होती. ज्या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि मेद यांचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. लहान वयातच मधुमेह आणि लठ्ठपणा या आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली होती.
एका सर्वेक्षणानुसार जंक फूडच्या सेवनानं 20 टक्के विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलंय. लहान वयात आलेल्या लठ्ठपणामुळे मोठेपणी ब्लडप्रेशर, मधमेह, हृदयविकार यासारखे जीवघेण्या रोगांचं प्रमाण वाढत चाललंय. नुकत्याच जारी झालेल्या आकेडवारीनुसार 2000 ते 2013 या तेरा वर्षात लठ्ठपणामुळे झालेल्या मधुमेहाचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. त्यामुळे याविषयी सरकारी स्तरावर पावलं उचलण्याची गरज भासू लागली होती.