काश्मीरमध्ये पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ पोलीस जखमी

जम्मू काश्मीर सरकारच्या मंत्र्यांच्या पोलीस ताफ्यावर दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला. 

Updated: Sep 21, 2017, 09:42 PM IST

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीर सरकारच्या मंत्र्यांच्या पोलीस ताफ्यावर दहशतवाद्यांनी चढवलेल्या हल्ल्यात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला. तर 34 जण जखमी झाले, त्यात 7 सुरक्षाजवानांचाही समावेश आहे. 

जम्मू काश्मीरचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नईम अख्तर, पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल दौ-यावर असताना, सकाळी पाऊणे बाराच्या दरम्यान हा हल्ला झाला. सुदैवानं या ग्रेनेड हल्ल्यातून मंत्री नईम अख्तर थोडक्यात बचावले. 

मात्र या हल्ल्यात एक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी विमानानं श्रीनगरला नेण्यात आलंय. या भ्याड हल्ल्याचा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि इतरांनीही तीव्र शब्दांत निषेध केलाय.