Tax on Rental Income: जर तुम्ही घर भाड्याने घेतले असेल किंवा दिले असेल तर तुम्हाला rental income वरील टॅक्सबद्दल माहिती असणे आवश्यक ठरते.
जेव्हा तुम्ही घर भाड्याने देता तेव्हा तुम्हाला ठराविक असे उत्पन्न मिळते या उत्पन्नावर टॅक्स असतो जो घरमालक म्हणून तुम्हाला भरावा लागतो. जरी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यातून उत्पन्न मिळवले असेल तरीही तुम्ही कर भरण्यास जबाबदार आहात. भाड्याचे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि तुम्ही ज्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येता त्यानुसार तुम्हाला कर हा भरावा लागतो.
जर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत भाड्यातून येत असेल तर आणि ते उत्पन्न चालू आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपर्यंत असेल तर टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक नाही. भाड्याच्या उत्पन्नावरही विविध deduction आहेत. Income Tax विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार वर्षभरात भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नाला Gross Annual Value म्हणतात. या उत्पन्नातून कर वजा होतो.
जर एका महिन्याचे भाडे 30,000 रुपये असेल तर एका वर्षाचे भाडे 3.6 लाख रुपये होते याला एकूण वार्षिक मूल्य (Gross Annual Value) म्हणतात. Gross Annual Value मधून तुम्ही Tax deduction केल्यावर तुम्हाला Net Annual Value मिळते. कलम 24A अंतर्गत तूम्हाला deduction मिळते. समजा तुम्ही 60 हजार रूपये कर भरला आहे. तर तुमचे निव्वळ वार्षिक मूल्य (Net Annual Value) 3 लाख रुपयांपर्यंत खाली येते. (3,60,000 - 60,000 = 3,00,000)
कलम 24A अंतर्गत 30% deduction मिळते. जर भाड्याने दिलेली मालमत्ता गृहकर्जाच्या मदतीने खरेदी केली असेल तर व्याजाचे payment कलम 24B अंतर्गत deduction साठी पात्र आहे.