Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या

पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

Updated: Sep 21, 2022, 06:27 PM IST
Knowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या title=

Interesting Facts Of Birds: पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे. निरोगी आयुष्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक आहे. यासाठी झोपण्याची जागा स्वच्छ आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे. अनेकांना झोपल्यानंतर वारंवार कुस बदलण्याची सवय असते. यामुळे बेडवरून खाली पडण्याची शक्यता असते. पण झाडावर झोपणारे पक्षी कधी खाली पडत नाहीत, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला जाणून घेऊयात यामागचं कारण

पक्षी खूप कमी झोपतात

पक्षी माणसासारखी आठ ते नऊ तास झोप घेत नाहीत. ते खूप छोटी छोटी झोप घेतात. त्यांना गाढ झोप घेण्यासठी फक्त 10 सेकंदाचा वेळ लागतो. यासह पक्षी एक डोळा उघडा ठेवून झोप घेऊ शकतात. पक्ष्यांचं आपल्या मेंदुवर नियंत्रण असतं. झोपताना मेंदुचा (Brain)  एक भाग कायम अॅक्टिव्ह असतो. पक्ष्यांचा ज्या बाजूचा डोळा उघडा असतो त्याच्या विरुद्ध बाजूचा मेंदू सक्रीय असतो. यामुळे स्वत:ला शिकारीपासून (Hunter) वाचवण्यास सक्षम असतात. 

Relationship: विवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? जाणून घ्या मागची 5 कारणं

पक्ष्यांमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे त्यांच्या पायाची रचना (Leg's Design) . झाडाच्या फांदीवर बसताना घट्ट पकड बसावी या दृष्टीने त्यांना निसर्गाने दिलेली देण आहे. यामुळे पक्ष्यांना झाड्यावर व्यवस्थितरित्या बसता (Grip)  येतं.