कोलकाता : पावसामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसात समोर येत आहेत. कोणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला तर कोणी उघड्या नाल्यामध्ये बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असाच एक गंभीर प्रकार कोलकातामधून समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आकाशातून वीज पडल्याने २१ वर्षाच्या तरुण क्रिकेटरचा जागीच मृत्यू झाला आहे. देबब्रत पाल असे या खेळाडूचे नाव आहे. तो गेल्या ६ महिन्यांपासून तो कोलकाता क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत होता. आम्ही आमच प्रशिक्षण सुरू करणार होतो तेव्हा वीज पडायला सुरूवात झाल्याचे क्लबचे सचिव अब्दुल मसूद यांनी सांगितले.
देबब्रत पाल हा अचानक मैदानात कोसळला त्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. पण तो शुद्धीत न आल्याने जवळच्या रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.