नवी दिल्ली : कानपूर चकमकीप्रकरणी विरोधकांनी योगी सरकारला चांगलेच घेरले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केला. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी योगी सरकारवर केला । मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केलीhttps://t.co/kpo9phlA1j#UPPolice #Encounter #VikasDube #YogiAdityanath @ashish_jadhao pic.twitter.com/KHe0nmoYY7
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2020
आरोपीला पकडण्यासाठी गेले असता पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करते, असे ट्विट करत उत्तर प्रदेशातील कायदा आण आणु सुव्यवस्था खालावली आहे. गुन्हेगारांची भीती संपली आहे, असा संताप व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य जनता आणि पोलीसदेखील सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. इतक्या गंभीर घटनेनंतर त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये अजिबात हलगर्जीपणा नको, असंही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीत उपअधीक्षकासह ८ पोलीस मारले गेलेत. कानपूरच्या बिकरू गावात गुंड विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला.
Law and order situation in UP has deteriorated, CM should take strict action: Priyanka Gandhi Vadra on Kanpur encounter
Read @ANI Story | https://t.co/AIPE8geVvr pic.twitter.com/xqZCuR7fm0
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2020
घटनास्थळी पोलिसांची दुसरी टीम दाखल झाली असून, फॉरेन्सिक टीमनेही तपासकार्य सुरु केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश डिजीपी एच सी अवस्थी यांना दिले आहेत.