LIC Policy | एलआयसी पॉलिसीशी संबधित सर्व अपडेट मिळणार फक्त एका कॉलवर; एजंटची गरज नाही

आता पॉलिसीशी संबधित माहिती मिळवण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही एका कॉलवर सर्व माहिती घेऊ शकता.

Updated: Oct 4, 2021, 02:13 PM IST
LIC Policy | एलआयसी पॉलिसीशी संबधित सर्व अपडेट मिळणार फक्त एका कॉलवर; एजंटची गरज नाही title=

मुंबई : आतापर्यंत एलआयसी पॉलिसीच्या माहितीसाठी एजंटकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता पॉलिसीशी संबधित माहिती मिळवण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्ही एका कॉलवर सर्व माहिती घेऊ शकता.

एलआयसीशी संबधित सर्व अपडेट एका कॉलवर
एलआयसीने आता आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा देत आहे. याअंतर्गत आपल्याला पॉलिसीशी संबधित माहितीसाठी किंवा अपडेटसाठी एलआयसी एजंटकडे जाण्याची गरज नाही. आता तुम्हाला एलआयसी पॉलिसीमधील बदल, माहिती, अपडेट सर्व काही एका कॉलवर मिळणार आहे. त्यासाठी एलआयसीने पद्धत ठरवून दिली आहे.

जाणून घ्या याची पूर्ण प्रक्रिया
1. यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर मोबाईल क्रमांक अपडेट करावा लागेल
2. एलआयसीच्या www.licindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
3. होमपेजवर कस्टमर सर्विस ही कॅटगरी निवडा
4. कस्टमर सर्विस कॅटगरी अंतर्गत अपडेट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा.
6. आता नवीन पेजवर या या पेजवरून तुम्हाला मागितलेली माहिती भरा
7 सर्व माहिती भरल्यानंतर डिक्लेरेशनवर yes क्लिक करा. आण सबमिट करा

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एलआयसीचे ग्राहक असाल तर पॉलिसी नंबर विचारण्यात येईल. येथे अधिकृत पॉलिसी नंबर नमूद करून वेरिफाई करा. आता तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स अधिकृत वेबसाईटवर अपडेट होईल. यानंतर पॉलिसीशी संबधित माहिती किंवा नवीन पॉलिसीबाबत नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येतील.