LIC Special Campaign : एलआयसीची विशेष मोहिम, पॉलिसीधारकांना सुवर्णसंधी...

LIC Special Campaign : ज्या पॉलिसीधारकांना काही कारणांमुळे प्रीमियम भरता आला नाही आणि त्यांची पॉलिसी बंद करण्यात आली त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Updated: Aug 17, 2022, 01:08 PM IST
LIC Special Campaign : एलआयसीची विशेष मोहिम, पॉलिसीधारकांना सुवर्णसंधी... title=

LIC Special Campaign : सार्वजनिक क्षेत्रातील लोकप्रिय असणाऱ्या भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने बंद झालेल्या (Lapsed) वयक्तिक विमा पॉलिसींना पुन्हा एकदा सुरु करण्याची संधी देत एक मोहीम सुरु केली आहे. एलआयसीने मंगळवारी सांगितलं की, यूलिप (Unit Linked Insurance Plan) वगळता इतर सर्व पॉलिसींना विशेष मोहीमेच्या अंतर्गत विलंब शुल्कमध्ये सूट देऊन पुन्हा सुरु केलं जाऊ शकतं. ही मोहीम 17 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. 

एलआयसीच्या एका विशेष मोहीमेच्या अंतर्गत बंद पडलेल्या पॉलिसींना पॉलिसीधारक पुन्हा सुरु करु शकतात. एलआयसीच्या विधानानुसार, एक लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमसाठी विलंब शुल्कमध्ये 25 टक्क्यांपर्यंतची सवलत मिळू शकेल. ही सूट जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर, एक ते तीन लाख रुपयांच्या प्रीमियमसाठी ही सूट जास्तीत जास्त 3,000 रुपये इतकी आहे. 

एलआयसीच्या विधानानुसार, यूलिप (ULIP) व्यतिरिक्त इतर सर्व पॉलिसी काही अटींच्या अधीन राहून पहिल्या प्रीमियममध्ये डिफॉल्ट झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत पुनर्जीवित केल्या जाऊ शकतात. विमा कंपनीने सांगितलं की, सूक्ष्म विमा पॉलिसींसाठी, जोखीम कव्हर करण्यासाठी विलंब शुल्कावर 100 टक्के सूट दिली जाईल. ज्या पॉलिसीधारकांना काही कारणांमुळे प्रीमियम भरता आला नाही आणि त्यांची पॉलिसी बंद करण्यात आली त्यांच्या फायद्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, विलंब शुल्कात 3,500 रुपयांच्या जास्तीत जास्त सवलतीसोबतच 3 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियमवर 30 टक्के सूट दिली जाईल.