इंदूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी आणखी सात जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे . त्यामध्ये इंदूरमधील जागेचा समावेश आहे. इंदूरमध्ये सुमित्रा महाजन यांच्या ऐवजी शंकर ललवानींना उमेदवारी देण्यात आली आहे. ७५ वर्षांच्या वर असलेल्यांना भाजपामध्ये तिकीट देण्यात येत नाही. त्यानुसार यावेळी सुमित्रा महाजनांना तिकीट नाकारण्यात आले. आता त्यांच्याजागी शंकर ललवानींना उमेदवारी देण्यात आली.
ललवानी हे इंदूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे अध्यक्ष आहेत. ललवानी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतले. तर दिल्लीत हर्ष वर्धन यांनी चांदनी चौकातून पुन्हा उमेदवारी दिली. उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारींना, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिदुरींना तिकीट देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांना अमृतसरमधून उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये याठिकाणाहून अरुण जेटली यांनी निवडणूक लढवली होती.