Trending News In Marathi: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शहरांबरोबरच गावा-गावातही निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. गावातही नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यानिमित्ताने गावातील कार्यकर्त्यांनीही जोमाने तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेत्याच्या प्रचारात एक शेतकरी इतका व्यस्त होता की त्याच्या रोजच्या जबाबदाऱ्या व शेतीची कामे विसरुनच गेला. त्यांची पत्नी नेहमी त्याला शेतीच्या कामांची आठवण करुन देत होती. मात्र त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते. शेवटी पत्नीने त्याला चांगलाच हिसका दाखवला आहे. शेतकऱ्याची अवस्था पाहून नेत्याच्या कार्यकर्त्यांनीही मग तिथून काढता पाय घेतला.
नेत्याच्या प्रचारात शेतकरी इतका गुंग होता की त्याला आपल्या पिकांची कापण करायची आहे. याचे भानही नव्हती. त्याच्या या वागण्याने वैतागलेल्या पत्नीने त्याला अनेकदा पिकांची कापणी करण्याची आठवण करुन दिली. त्याला शेतात जाण्यास सांगितले. मात्र, शेती व पिके वाऱ्यावर सोडून तो प्राचारासाठी धावत होता. त्याच्या या रोजच्या वागण्याला वैतागलेल्या पत्नीने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. पत्नीने त्याला चांगलाच इंगा दाखवला. शेतकऱ्याला पत्नीचा मार खाताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याची मदत केली आणि त्याला शेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुका आहेत. दनकौर क्षेत्रातील एक व्यक्तीदेखील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी रात्र-दिवस मेहनत करत आहेत. त्याला घरुन आणण्यासाठी जेव्हा पण नेत्याची गाडी यायची तेव्हा तो हातातील सर्व कामे टाकून जायचा. इतकंच, नव्हे तर कार्यकर्त्यांसोबत गावा-गावात फिरुन पक्षालाच मतदान करण्याचं आवाहन करत होता.
प्रचारात व्यस्त असलेल्या हा व्यक्ती सकाळी घरातून निघायचा ते रात्री नेत्याकडूनच हॉटेलमध्ये जेवण करुन घरी यायचा. त्याची पत्नी कित्येक दिवस त्याला शेतातील पिके कापून आणण्यास सांगत होती. मात्र तो काही ऐकायला तयार नव्हता अखेर तिच मुलांसोबत जाऊन कापणीसाठी जायला लागली. शनिवारी सकाळी जेव्हा उमेदवाराची गाडी दारासमोर आली तेव्हा पत्नीने पुन्हा त्याला गव्हाची कापणी करण्याची आठवण करुन दिली. जर आता कापणी नाही केली तर पिके खराब होतील, असं तिने सांगीतले.
पत्नीने पुन्हा शेतीचा विषय काढल्यानंतर शेतकऱ्याने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर चिडलेल्या पत्नीने त्याला चांगलीच अद्दल घडवली. शेतकऱ्याला मारहाण होताना पाहून नेत्याच्या कार्यकर्त्यांनीही तिथून काढता पाय घेतला.