श्रीनगर: काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला आहे. दक्षिण काश्मीरच्या राजापोरा परिसरात गुरुवारी एका IED (improvised explosive device) स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली. यानंतर बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी येत ही स्फोटके निकामी केली. प्राथमिक माहितीनुसार, ४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके जप्त करण्यात आली. चार ते पाच दिवसांपूर्वी सुरक्षादलांना एका कारमधून स्फोटके आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
काश्मीरमध्ये ओलिसांची सुटका करताना चार भारतीय जवान शहीद
यानंतर सुरक्षा दलांकडून या कारचा कसून शोध घेतला जात होता. अखेर आज सकाळ राजापोरातील Ayengund परिसरात ही कार आढळून आली. यानंतर तात्काळ बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे दहशदवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला गेल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली. भारतीय जवान याठिकाणी पोहोचले तेव्हा दहशतवादी कारमध्ये होते. मात्र, जवानांना बघून त्यांनी पळ काढला.
पाकिस्तान घाबरला; सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने सीमारेषेवर विमानांची गस्त वाढवली
A major incident of a vehicle-borne IED blast averted by the timely input and action by Pulwama Police, CRPF and Army: Kashmir Zone Police #JammuAndKashmir pic.twitter.com/oR0aVMZYG0
— ANI (@ANI) May 28, 2020
काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी CRPF आणि पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान जखमी झाले होते. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी अशाचप्रकारे स्फोटकांनी भरलेले वाहन CRPF च्या ताफ्यावर नेऊन आदळले होते. यामध्ये CRPF चे ४४ जवान शहीद झाले होते. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता.