राजस्थानच्या झुंझुनुं जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्याला पोस्टमार्टमपूर्वी 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवलं. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान घाटावर नेणेयात आलं. मात्र चितेवर झोपण्यापूर्वी त्याचा श्वास सुरु झाला. शरीराची हालचाल झाली. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक घाबरे आणि धावत पळत ऍम्ब्युलन्स बोलवण्यात आली. आता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. असाच एक प्रकार 47 वर्षी रोहिताशसोबत घडली आहे. याच्यावर आता आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. तसेच त्यांची तब्बेत आता स्थिर असल्याच सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांनी रोहिताशला स्वतः मृत घोषिक केले होते. एवढंच नव्हे तर त्याचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहात 2 तास डीप फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं.
रोहिताश झुंझुनुं जिल्ह्यातील एका माँ सेवा संस्थानाच्या आश्रमात राहत होता. त्याला बोलता आणि ऐकू येत नव्हतं. गुरुवारी दुपारी रोहिताशची तब्बेत बिघडली आणि त्याला झुंझुनुंच्या बीडीके रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. उपचारा दरम्यान दुपारी 1 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मृत घोषित केल्यानंतर रोहिताशच्या शरीराला रुग्णायातील शवघरात पाठवण्यात आलं. जेछे जवळपास 2 तास त्याला रुग्णालयातील शवपेटीत ठेवण्यात आलं. पोलीस आल्यानंतर पंचनामा करुन इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. दुपारी 4 वाजता रोहिताशचा मृतदेह माँ सेवा संस्थानातील पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात आळा.
सायंकाळी 5 वाजता रोहितेशचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून झुंझुनू येथील पंचदेव मंदिराजवळील स्मशानभूमीत नेण्यात आला. येथे रोहिताशचा मृतदेह चितेवर ठेवल्यावर त्याचा श्वासोच्छवास सुरू झाला आणि शरीराची हालचाल सुरू झाली. हे पाहून उपस्थित लोक घाबरले. यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून रोहिताला रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना रुग्णालयात पोहोचण्याच्या सूचना दिल्या आणि घटनेची माहिती जयपूर येथील विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना देण्यात आली. परिसराचे तहसीलदार महेंद्र मुंड, सामाजिक सक्षमीकरण विभागाचे उपसंचालक पवन पुनिया हेही रुग्णालयात पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलमध्ये पीएमओ डॉ.संदीप पाचर यांच्या उपस्थितीत अनेक तास डॉक्टरांची बैठक झाली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी राम अवतार मीना यांनी मुख्य वैद्यकीय अधिका-यांकडून संपूर्ण अहवाल मागवला असून चौकशी समितीही स्थापन केली आहे.
रोहिताशचा खरोखरच मृत्यू झाला होता की, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला चुकून मृत घोषित केले होते, या सर्व बाबींचा तपास समिती आपला अहवाल देणार आहे. पण, दोन तास डीप फ्रीजमध्ये ठेवलेले शरीर श्वास कसे घेऊ शकले असते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहिताश खरोखरच मेला होता आणि त्याचा श्वास परत आला होता का? कदाचित खरोखरच काही चमत्कार घडला होता का, या प्रश्नांची उत्तरे तपासानंतर मिळू शकतील. मात्र या घटनेने झुंझुनूमधील सर्वांनाच धक्का बसला आहे.