Meta To Get Parliamentary Panel Summons Over Zuckerberg's India Poll Remark : गेल्या काही दिवसांपासून मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी गेल्या शुक्रवारी 10 जानेवारी 2025 ला एका पॉडकास्टमध्ये कोरोनानंतरच्या परिस्थितीवर भारताविरोधात मोठं विधान केलंय. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्क यांच्या दाव्यावर टीका केलीय. तरदुसरीकडे भारताची संसदीय समिती META ला मानहानीसंबंधी समन्स पाठवणार असल्याच सांगितलं. शिवाय मार्क झकरबर्ग यांना माफी मागावी लागेल असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे मार्क झकरबर्ग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
भाजप खासदार आणि कम्युनिकेशन-माहिती तंत्रज्ञानाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी म्हटलंय की, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल 'मेटा'नं माफी मागावी. आम्ही मेटाच्या लोकांना कॉल करणार आहोत. झकरबर्ग यांनी कोरोना काळानंतर सरकारविरोधात वातावरण तयार झाल्याचं विधान केलं. त्यात भारताचा उल्लेख केलाय. मेटावाल्यांना भारत सरकारची माफी मागावी लागणार आहे, अन्यथा आमची समिती कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही समिती सदस्यांशी बोलणार असून मेटावाल्यांना 20 ते 24 जानेवारी दरम्यान उपस्थित राहण्यास सांगणार आहोत, असं ते म्हणाले.
मार्क झकरबर्गच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'भारतातील जनतेने मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. 2024 मध्ये भारतात निवडणूक पार पडली ज्यामध्ये तब्बल 64 कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएवर विश्वास दाखवला. त्यामुळे 2024 मध्ये भारतासह बहुतांश विद्यमान सरकारे कोविडमुळे पराभूत झाली हा मार्क झुकरबर्गचा दावा तथ्यात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचा आहे.'
मेरी कमिटि इस ग़लत जानकारी के लिए @Meta को बुलाएगी । किसी भी लोकतांत्रिक देश की ग़लत जानकारी देश की छवि को धूमिल करती है । इस गलती के लिए भारतीय संसद से तथा यहाँ की जनता से उस संस्था को माफ़ी माँगनी पड़ेगी https://t.co/HulRl1LF4z
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) January 14, 2025
मार्क झकरबर्ग जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टमध्ये जी मुलाखत दिली त्यात म्हटलं की, गेल्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या घटना घडल्या. त्यात महागाई, कोरोनामुळ निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेक देशांतील सत्ताधारी पक्षाला सामना करावा लागला. भारतासह जगभरातील विविध देशांतील सरकारांनी कोरोनाकाळात राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणांमुळे आणि त्यादरम्यान घडलेल्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम लोकांची नाराजी आणि संताप निवडणूक निकालांत दिसून आला. जगभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या त्या ठिकाणी सत्तेतील सर्व लोक हरले .नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही निवडणुकीत हरले, असं विधान झकरबर्गनं केलंय.