नवी दिल्ली - बंगळुरू येथे 'मिराज २०००' या भारतीय लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. बेंगळुरू येथील एचएएल विमानतळाजवळ शुक्रवारी ही दुर्घटना घडली. या विमानात दोन वैमानिक होते. 'एएनआय' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी जवळपास ११ वाजून २० मिनिटांनी बेंगळुरूतील एचएएल विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात झाला.
'मिराज २०००' या लढाऊ विमानात दोन वैमानिक होते. या दुर्घटनेत दोनही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. स्क्वाड्रन लीडर नेगी आणि स्क्वाड्रन लीडर अबरोल अशी अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. परंतु ही दुर्घटना कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
#UPDATE The other pilot who had also ejected has succumbed to injuries in hospital. Both were test pilots- Squadron leader Negi and Squadron leader Abrol. #Bengaluru https://t.co/WZYA5RzWSU
— ANI (@ANI) February 1, 2019