कुस्तीत जिंकली, पण सासरच्यांसमोर हरली.. हुंड्यासाठी महिला कुस्तीपटूला काढलं घराबाहेर

कुस्तीपटू राणी राणाने राष्ट्रीय पातळीवर अनेक पदकं जिंकली. पण आयुष्याच्या लढाईत मात्र तिला मात खावी लागली. हुंड्यासाठी कुस्तीपटू राणीची घरातून हकालपट्टी करण्यात आली. राणीने आपल्या सासरच्यांवर आरोप केला आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 8, 2023, 06:55 PM IST
कुस्तीत जिंकली, पण सासरच्यांसमोर हरली.. हुंड्यासाठी महिला कुस्तीपटूला काढलं घराबाहेर title=

Wrestler Ravi Rana Dowry Case : आपल्या देशात हुंडा (Dowry) घेणं आणि देणं या दोनहीवर कायद्याने बंदी आहे. यानंतरही हुंड्यावरुन विवाहितेचाा छळ केल्याच्या अनेक घटनास समोर येत असतात. आता तर राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूलाच हुंड्यासाठी त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशमधल्या ग्वालिअर इथली प्रसिद्ध कुस्तीपटू राणी राणा (Wrestler Rani Rana) हिला हुंड्यासाठी सासरच्यांनी घरातून बाहेर काढण्यात आलं. सासरच्यांनी हुंड्यासाठी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप कुस्तीपटून राणी राणाने केला आहे. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला वैतागून अखेर राणाने पती आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार (FIR) दाखल केली आहे.  

कुस्तीपटू राणी राणाने पती प्रिन्स, सासरे अनिरुद्ध आणि सासू सुमन राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर तीने पत्रकार परिषेद घेत आपल्यावरील अत्याचाराची माहिती मीडियाला दिली. लग्न झाल्यानंतर राणी आपल्या पतीसह ग्लालिअरमधल्या एमएच चौराह इथं राहत होती. 

घरातून बाहेर पडणं केलं बंद
राणीने मीडियाला दिलेल्या माहितीनुसार पती प्रिन्सआणि सासू-सासऱ्यांनी लग्न झाल्यापासून हुंड्यासाठी तिचा छळ सुरु केला. टोमणे मारणं, शिवीगाळ करणं, माहेरुन हुंडा आणण्यासाठी तगादा लावणं अशा प्रकारे त्रास दिला जात होता. इतंकच काय तर तिचं घराबाहेर पडणंही बंद करण्यात आलं. पती प्रिन्स आणि सासरचे तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होते. पण आपले आई-वडिल इतके पैसे देऊ शकत नाहीत हे तीने आपल्या सासरच्यांना सांगितलं. त्यावर सासरच्यांनी तिला मारहाण सुरुवात केली. तिच्या कुस्ती खेळण्यावरही बंदी घालण्यात आली. राणी राणा आणि प्रिन्स यांचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. 

मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत
कुस्तीपटू राणीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्याकडे न्यायाची विनंती केली आहे. कुस्तीत राज्यासाठी अनेक पदकं जिंकली. कुस्तीने नाव मिळवून दिलं. पण ती कुस्ती खेळण्यावरच बंदी घालण्यात आली. स्पर्धेतही भाग घेण्यास मनाई करण्यात आल्याचं तीने आपल्या विनंती अर्जत म्हटलं आहे. 

कुस्तीपटू रानी राणाच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. राणी राणा ही ग्वालिअरच्या जतारा गावात राहाते. सामान्य घरातील राणीने परिस्थितीशी संघर्ष करत राष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेतली. लहानपणापासूनच तिला कुस्तीची आवड होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तीने कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नाव कमावलं.