नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पहिला याचिका दाखल झाली आहे. मुस्लीम लीगच्या चार खासदारांनी ही याचिका दाखल केली आहे. तर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल मुस्लीम लीगकडून लढणार आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे धर्माच्या आधारावर असून संविधान त्याला परवानगी देत नाही. हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद १४ चं उल्लंघन करत असल्याने रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
इंडियन यूनियन मुस्लीम लीगने आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, 'नागरिकत्व सुधारणा विधेयक हे संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार ट्वीन टेस्टमध्ये पास नाही झालं. धर्माच्या आधारावर याचं वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे. हे विधेयक संविधानाच्या सेक्युलरिज्मच्या मूळ सिद्धांताचं हनन करतो.'
इंडियन यूनियन मुस्लीम लीगच्या खासदारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेकडून कपिल सिब्बल हे बाजु मांडणार आहेत. तुम्ही अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या लोकांना कसं नागरिकत्व देऊ शकता. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं तो काळा दिवस होता. असं या खासदारांनी म्हटलं आहे.