''लहान डोळे असल्याने...'' नागालँडचे मंत्री Temjen Imna यांचा मजेदार खुलासा, व्हिडीओ व्हायरल

ईशान्येकडील लोकांचे डोळे छोटे आहेत आणि त्यामुळे बरेच लोक त्यांना चिडवतात, तसेच अनेकांना चीनचे असल्याचे देखील बोलले जाते.

Updated: Jul 10, 2022, 05:14 PM IST
''लहान डोळे असल्याने...'' नागालँडचे मंत्री Temjen Imna यांचा मजेदार खुलासा, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई :  नागालँडचे मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष टेमजेन इमना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो खूपच मनोरंजक आहे, त्यांनी छोटे डोळे  असण्याचे फायदे काय असतात ते सांगितले. त्याचे हे फायदे ऐकून तुम्हाला देखील त्यांच्या बोलण्यात तथ्य वाटेल आणि तुम्ही स्वत:ला त्यावर हसण्यापासून रोखू शकणार नाही. यामुळेच हा व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे.

ईशान्येकडील लोकांचे डोळे छोटे आहेत आणि त्यामुळे बरेच लोक त्यांना चिडवतात, तसेच अनेकांना चीनचे असल्याचे देखील बोलले जाते. परंतु अशाच लोकांना मंत्री टेमजेन इमना यांनी मजेदार पद्धतीने उत्तर दिलं आहे.

मंत्री टेमजेन इमना यांनी डोळे लहान असल्याचे फायदे सांगितले,  नागालँड भाजपचे अध्यक्ष तेमजेन इमना म्हणाले की, ''लोक म्हणतात की ईशान्येकडील लोकांचे डोळे लहान आहेत. आमचे डोळे लहान आहेत, पण ते खूप चांगले पाहू शकतात.''

पुढे ते हसले आणि थांबत म्हणाले, ''लहान डोळे असण्याचा एक फायदा आहे. घाण कमी आत शिरते आणि कधी कधी लांबलचक कार्यक्रम चालू असताना, आपण एकप्रकारे झोपू शकतो.''

टेमजेन इमना यांच्या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी टेमजेन इमना यांचे कौतुक केले आहे.