श्रीनगर : जम्मू काश्मीर सरकारकडून गेल्या सात महिन्यांपासून नजरकैदेत असणाऱ्या माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली आहे.
नजरकैदून सुटका झाल्यानंकर अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. जम्मू आणि काश्मीरची केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेली विभागणी, अनेक महिन्यांपासून येथील मुलांना शाळेत जाण्यासही होणाऱ्या अडचणी, शिकाऱ्यावरच उरदनिर्वाह करणाऱ्यांच्या अडचणी या साऱ्याविषयी किंबहुना ज्या गोष्टी बदलल्या आहेत त्याविषयी आपण बोलणारच आहोत, असं सांगत अब्दुल्ला यांनी सद्यपरिस्थितीला कोणतंही वादग्रस्त विधान करणं टाळलं.
कोरोनाचं संकट पाहता या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. 'आज मला कळत आहे की आपला जगण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. मी इतकंच सांगेच की, डिटेंशनमध्ये असणाऱ्या सर्वांचीच यावेळी सुटका केली गेली पाहिजे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे', असं ते म्हणाले.
Today, I, realise that we are fighting a war of life and death. All our people who have been detained should be released at this time. We must follow govt orders to fight Coronavirus: National Conference leader Omar Abdullah https://t.co/YVU012dfJc pic.twitter.com/k8CQad1Mdz
— ANI (@ANI) March 24, 2020
The way J&K was broken up into 2 UTs, how children couldn't go to school for months,shopkeepers didn't have an earning, Shikara owners had to face difficulties..I'll talk about what all happened since 5 Aug'19 after the current situation passes: Omar Abdullah pic.twitter.com/e1r85p1Amn
— ANI (@ANI) March 24, 2020
दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांच्यावर जनसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.