Political News : आगामी लोकसभा निवडणुकींच्या धर्तीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली असून, विरोधी पक्षातील काही हुकमी एक्के आपल्या बाजुनं वळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. भाजप असो किंवा मग महाविकासआघाडी. प्रत्येक पक्षातील मोठे नेते सध्या राजकारणाच्या या रणधुमाळीत सक्रीय असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा एक सर्व्हे नुकताच समोर आला आहे. देशपातळीवर करण्यात आलेल्या या सर्व्हेमधून महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इंडिया टुडे सी व्होटरच्या या सर्व्हेनं सध्या संपूर्ण देशासह नेतेमंडळींच्याही नजरा वळवल्या आहेत. येत्या काळात देशात एनडीएचीच सत्ता कायम राहील हे कितीही खरं असलं तरीही INDIA आघाडीला मात्र या निवडणुकांच्या सत्रात मोठी खेळी पाहायला मिळणार आहे. कारण, इंडिया आघाडीचं संख्याबळ वाढणार असल्यामुळं सत्ताधाऱ्यांना आणखी विरोधकांचा सामना करावा लागणार असल्यामुळं मोदी सरकारपुढची आव्हानं वाढताना दिसतील.
इंडिया टुडे सी व्होटर सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकासआघाडीचीच सरशी कायम राहील. मात्र त्यांच्या कामगिरीवर मात्र सर्व स्तरांतून ताशेरे ओढले जाणार आहेत. या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशाचं राजकारण स्थिर राहिलं तरी राज्याचं राजकारण मात्र ढवळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.