नवी दिल्ली : देशात आता पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. दरम्यान विमाने प्रवास करणाऱ्यांसठी नागरी वाहतूक महासंचालनालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियमांचं पत्रक जारी केलं आहे. त्यामुळे प्रवाश्यांना अधिक खबरदारी घेणे आवश्यक असणार आहे.
प्रवासादरम्यान जे प्रवासी नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील डीजीसीएने पत्रकात स्पष्ट केलं आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क लावत नाहीत किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसतील तर त्यांना विमानातून खाली उतरवण्यात येणार आहे.
डीजीसीएने जारी केकेले नियम
- प्रवासा दरम्यान मास्क बंधनकारक असणार आहे. शिवाय सोशल डिन्स्टसिंगचं पालन प्रवाश्यांना करावं लागणार आहे.
- काही समस्या असल्याशिवाय मास्क नाकाखाली खाली करता येणार नाही.
- कोणी मास्क शिवाय विमानात प्रवेश करू नये यावर CISF किंवा अन्य पोलिसांकडून खात्री करण्यात येणार आहे.
- विमानात, एखाद्या प्रवाशाने कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास त्याला सक्त ताकिद देण्यात येणार असून कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पत्रकात नमूद केले आहे.
- प्रवासावेळी विमानतळात प्रवेश केल्यापासून ते निश्चित स्थळी पोहोचेपर्यंत मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.