मुंबई : विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव १०० रुपयांनी कमी झाले आहेत. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रविवारी याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत. ग्राहकांना एका वर्षात १२ अनुदानित सिलेंडर मिळतात. एलपीजी दरांमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना १४२.६५ रुपयांचं अनुदान मिळेल. यामुळे एलपीजीचे दर ४९४.३५ रुपये होतील.
सबसिडी घेणाऱ्या गॅस सिलेंडर ग्राहकांना रिफिल करताना बाजार मुल्यानुसार रक्कम भरावी लागते. त्यानंतर सबसिडी ग्राहकाच्या बॅंक खात्यात दिली जाते. ग्राहकांना एका वर्षात 12 सिलिंडर सबसिडी वर मिळतात. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्यानंतर ग्राहकांना आता 142.65 रुपयांची सबसिडी मिळाल्यानंतर जुलैमध्ये सिलेंडर दर 494.35 रुपये असेल.