नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी) प्रमुख के व्ही चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संकेतांना अधिकच बळकटी मिळाली आहे. के व्ही चौथरी यांनी म्हटले आहे की, नोटबंदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांद्वारे बॅंकाकडे किती रक्कम जमा करण्यात आली, याबाबतचा तपशील सीव्हीसीने मागवला आहे. आगोदर आम्ही 'सीबीडीटी'कडून (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स) आकडे मागवले आहेत. ही आकडेवारी प्राप्त झाल्यावर आम्ही पुढील कार्यवाही सुरू करू. त्यासाठी सरकारमधील विविध विभागांशीही आमची बोलणी झाली आहेत, असे के व्ही चौधरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना के व्ही चौथरी यांनी असेही म्हटले आहे की, सीबीडीटी पहिल्यांदा हे तापासून पाहिल की, ज्या कर्मचाऱ्याने रक्कम जमा केली आहे ती, रक्कम त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत योग्य आहे की नाही. अर्थात, ही चौकशी मोठ्या प्रमाणावर आणि संशयास्पद व्यवहार झालेल्या सर्वांचीच केली जाईल, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले आहे.