नवी दिल्ली : मोबाईल नंबर आधार कार्डला लिंग करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जनतेची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यातच अनेकदा चुकीच्या माहितीमुळे आणि चर्चेमुळे लोकांना अधिक गोंधळ उडतो. मात्र ही प्रक्रीया काहीशी सोपी करण्यात आली आहे. यापूर्वी मोबाईल नंबर आधार कार्डला लिंग करण्यासाठी बायोमॅट्रिक देणे गरजेचे होते. मात्र आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. UIDAI ने ट्विट करून बायोमॅट्रिक गरजेचे नसल्याचे सांगितले आहे. म्हणून ज्यांनी अजून मोबाईल नंबर आधार कार्डला लिंग केलेला नाही त्यांनी १ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी. UIDAI सांगितल्यानुसार तुम्ही फिंगरप्रिंट शिवाय सिमकार्ड लिंक करू शकता.
UIDAI चे ट्विट :
लोकांच्या उडालेला गोंधळ दूर करण्यासाठी हे ट्विट मदत करेल. ट्विटनुसार १ डिसेंबर २०१७ नंतर युजर्स ओटीपी (OTP) च्या आधारे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करू शकता. त्यासाठी बायोमॅट्रिक देण्याची गरज नाही.
By 1 Dec 2017, you can also choose to verify your mobile SIM with Aadhaar without giving your biometrics to Telecom Service Providers. pic.twitter.com/zcCKYbYgwP
— Aadhaar (@UIDAI) November 2, 2017
यामुळे युजर्सना बायोमॅट्रिक शिवाय मोबाईल नंबर आधाराला लिंक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आणि ती जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत सोयीची आहे.
मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१८ आहे. या कालावधीत सर्व युजर्सना मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.