VIRAL VIDEO : स्पायडर मॅनची क्रेझ कोणाला नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्पायडरमॅनची क्रेझ आहे. त्याच्यासारखं आपल्याला स्टंट करता यावेत असं बऱ्याचदा वाटत असतं. मात्र असे स्टंट जीवघेणे ठरू शकतात हे माहीत असतानाही काहीजण ते करण्याचा प्रयत्न करतात आणि अनर्थ घडतो.
एकाला स्पायडर मॅनसारखा स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. अमेरिकेतील डिज्नी कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्कमध्ये स्पायडर-मॅन रोबोटने केलेला स्टंट महागात पडला. या स्टंटचा व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता एका रेबोला स्पायडर मॅनचा ड्रेस घालून स्टंट करायला लावला. मात्र हा स्टंट यशस्वी झाला नाही. तर रोबो स्टंट करताना खाली कोसळला. हा व्हिडीओ 1.18 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
एका युजरने म्हटलंय की हा खरा माणूस आहे असं ज्या लोकांना वाटलं आणि त्यांनी हा व्हिडीओ पाहिलाय त्यांचं काय झालं असेल याचा विचार करा. हा रेबो असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अशा प्रकारचे स्टंट जीवघेणे ठरू शकतात त्यामुळे तुम्ही अजिबात असे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन झी 24 तास करत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी म्हटलंय की हा जिवंत व्यक्ती नव्हता देवाचे आभार मानायला हवेत. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. कोरोनामुळे डिज्नी कॅलिफोर्निया अॅडव्हेंचर पार्क बंद होतं. मात्र आता निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आलं. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे.
(हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही. असे कोणतेही स्टंट पाहून तरुणांनी करू नयेत झी 24 तासचं आवाहन)