नवी दिल्ली : कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात जबरदस्त वाढ झाली आहे. सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतींवर लगाम घालण्यासाठी इतर देशांतून कांद्याच्या आयातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतर-मंत्रालय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीकडून पुन्हा कांद्याची उपलब्धता आणि किंमतींचा आढावा घेण्यात आला.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीला प्रोत्साहन द्यावे, हा निर्णय घेण्यात आला आहे.
अफगानिस्तान (Afghanistan), इजिप्त (Egypt), तुर्की (Turkey) आणि इराण (Iran) येथील भारतीय अभियानांना भारताला कांदा पुरवठा करण्यास सांगितले आहे. लवकरच कांद्याचे ८० ते १०० कंटेनर भारतात पोहोचतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कांदा आयात करण्याचा निर्णय म्हणजे, कांद्याची स्थानिक उपलब्धता पुरेशी नसल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे.