काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. अनंतनाग बस स्थानकाजवळ झालेल्या या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. तर एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार सुरू होता. दोन दहशतवाद्यांनी प्रथम या जवानांना ग्रेनेडवर हल्ला केला. स्फोटानंतर त्यांनी एके - ४७ रायफलने गोळीबार सुरुच ठेवला. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात एकूण आठ लोक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. अनंतनाग पोलीस स्टेशन एसएचओ असद खान यांच्यासह पाच सीआरपीएफ कर्मचारी आणि इतर दोन गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांमध्ये एक स्थानिक महिला देखील सामील आहे.
J&K Police on today's Anantnag terrorist attack: The terrorist was gunned down on the spot. 5 CRPF personnel attained martyrdom while repulsing the attack. Area has been cordoned, search is underway. Case registered. pic.twitter.com/Emc1vBFsO5
— ANI (@ANI) June 12, 2019
दहशतवादी एका दुचाकीवर आले. त्यांनी बी / ११६ या बटलीयनवर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर जोरदार हल्ला केला. यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले. या घटनेत एका दहशतावाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. या घटनेनंतर आणखी जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार सुरुच असल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.
#UPDATE Total 5 CRPF personnel have lost their lives in Anantnag terrorist attack in Jammu & Kashmir, today. pic.twitter.com/sXoVnbkqzi
— ANI (@ANI) June 12, 2019
एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले, दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या एका टीमने दहशतवाद्यांना पाठलाग केला. सुरक्षा दलाचे सुरक्षा कवच तोडण्यासाठी दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. उलट, सुरक्षा दलांनी आपली कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर या हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त सैन्य दलाची आणखी एक तुकडी त्याठिकाणी दाखल झाली. भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन स्क्वाड, कमोंडोही त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार मारण्यात यश आले. त्यानंतर रात्री ८ वाजता दुसरा दहशतवादी सुरक्षा दलाने ठार केला.