शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येक तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी शिक्षण संपल्यानंतर प्रत्येकजण धडपड करत असतो. यात काहींना यश मिळतं तर काहीजणांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा मात्र आपल्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद असतो. अशीच कमाल उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील पलक मित्तलने केली आहे. पलक मित्तलने ट्रिपल आयटी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IIIT) मधून आपल बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
आयआयआयटी अलाहाबादमधील बी.टेक. पदवीधर पलक काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तिला अमेरिकन कंपनी Amazon ने 1 कोटी पगाराच्या पॅकेजसह नोकरीची ऑफर दिली होती. तिच्या लिंक्डइन अकाऊंटनुसार, पलक मित्तल सध्या बंगळुरूमध्ये फोनपे कंपनीत काम करत आहे. ती ऑगस्टमध्ये अॅमेझॉनच्या बर्लिनमधील ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून रुजू झाली.
क्लाउड प्लॅटफॉर्ममध्ये अनुभवी असणारी पलक AWS Lambda, AWS S3, AWS Cloudwatch, Typescript, Java आणि SQL सारख्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये देखील तज्ञ आहे. दरम्यान, पलकआधी आणखी काही तरुणांनीही अशी कामगिरी केली आहे. IIIT मध्ये शिकलेल्या अनुराग माकडे यांना गुगलकडून 1.25 कोटी आणि अखिल सिंगला रुब्रिककडून 1.2 कोटींचे पॅकेज मिळाले आहे.
आयबीपीएसमार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आयबीपीएस पीओ अंतर्गत एकूण 3 हजार 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) ही पदे भरली जाणार आहेत.
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बॅंका आयबीपीएस भरतीमध्ये सहभागी झाल्या आहेत.
यासाठी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
21 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.