मुंबई : पेट्रोल डिझेलचे दर बेलगाम झाले आहेत. दररोज इंधन दरात दरवाढ होत असल्याने रेकॉर्ड ब्रेक किंमतीची उंची गाठली आहे. अनेक राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर काही राज्यात शंभरीचा आकार पार केला आहे. इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना बसत आहे. तेल कंपन्यांनी आज 5 जुलै रोजी पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली आहे. डिझेलचे दर स्थिर आहेत. रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 100 रुपयांच्या प्रती लीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल 99.86 रुपये प्रती लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात तेजी वाढत आहे.
5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे रोजीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 35 वेळा दरात वाढ झाली आहे. तर 33 वेळा डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
देशाच्या अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार गेलेत. मुंबई, चेन्न्ई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बंसवाड़ा, इंदौर, जयपुर, भोपाळ, ग्वालियर, गुंटुर, ककिनाडा, चिकमंगलुर, शिवमोग्गा, पटना आणि लेह यांचा देखील समावेश आहे.
इंडियन ऑयलने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, 'आम्हाला ही घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे, सुमारे 30 हजार इंडियन ऑईल पेट्रोल पंप आता स्वयंचलित झाले आहे. आपल्या जवळच्या पेट्रोल पंपाला भेट द्या आणि ई-पावत्या, ऑटोमॅटिक लॉयल्टी पॉइंट्स आणि ऑटोमॅटिक पेमेन्ट मिळवा. ऑटोमॅटिक म्हणजे इंडियन ऑइल.'
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला SMSद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील मिळू शकतात (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर माहिती मिळवू शकतात. त्याचवेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPrice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
मुंबई 105.24 पेट्रोल आणि 96.72 डिझेलचे दर
ठाण्यात 105.23 रुपये पेट्रोल
वर्धा 105.76 रुपये पेट्रोल
वाशिम 105.95 रुपये पेट्रोल
यवतमाळ 106.37 रुपये पेट्रोल
अहमदनगर 105.42 रुपये पेट्रोल
अमरावती 105.38 रुपये पेट्रोल
औरंगाबाद 105.85 रुपये पेट्रोल
बीड 106.65 रुपये पेट्रोल
बुलढाणा 106.11 रुपये पेट्रोल
कोल्हापूर 106.05 रुपये पेट्रोल
नाशिक 106.21 रुपये पेट्रोल
उस्मानाबाद 106.03 रुपये पेट्रोल
पुणे 105.50 रुपये पेट्रोल
रत्नागिरी 106.65 रुपये पेट्रोल