मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरांत सतत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागत आहे. मात्र गेल्या २८ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत चढ-उतार झालेले नाही. त्यापूर्वी ६ दिवस सलग पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ नोंदवण्यात येत हाती. तेल कंपन्यांनी त्यांच्या किंमतींमध्ये बदल न केल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गेले २८ दिवस स्थिर आहेत.
त्याआधी पेट्रोल-डिझेलच्या दरांत ४८ दिवस बदल झाले नव्हते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्यास सुरूवात झाली. सांगायचं झालं तर मार्चमध्ये पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करण्यात आली.
तेव्हा तेल कंपन्यांनी तब्बल ८२ दिवस दरांत कोणतेही बदल केले नव्हते. आज सलग २४व्या दिवशी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये लिटर आहे. तर मुंबईमध्ये ग्राहकांना १ लिटर पेट्रोलसाठी ९०.३४ रूपये मोजावे लागत आहेत.
४ मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
दिल्ली ८३.७१
मुंबई ९०.३४
कोलकाता ८५.१९
चेन्नई ८६.५१
४ मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
दिल्ली ७३.८७
मुंबई ८०.५१
कोलकाता ७७.४४
चेन्नई ७९.२१
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.