मुंबई : अश्लील फोटो पाठवून मुलींना त्रास देणाऱ्या माथेफिरु फोटोग्राफरला (Photographer Arrest) जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. हा फोटोग्राफर लग्न समारंभ आणि इतर फक्शनमध्ये फोटो काढत असल्याचं कारण सांगून मुलींकडून नंबर मागून घेत होता. त्यानंतर त्यांना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून त्रास देत होता.
राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) सांगितले आहे की, या माथेफिरु फोटोग्राफरने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त मुलींना असे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले आहेत. जयपूर ग्रामीण एसपी शंकर दत्त यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या या युवकाचं नाव अमित रोहिल्ला असं आहे. त्याचं वय 26 वर्ष असून तो मूळचा झुंझुनू येथील आहे. जयपूर येथील बालाजी विहारमध्ये तो भाड्याच्या घरात राहतो
जयपूरमधील विकृत फोटोग्राफरला अटक
6 जुलै रोजी एका मुलीने या युवकाविरोधात गोविंदगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. आपल्या तक्रारीत या मुलीने म्हटले की, 11 डिसेंबर 2020 रोजी अज्ञात व्यक्तीने तिला काही अश्लील मेसेज सोशल मीडियावर पाठवले होते. याबाबत तिने आपल्या कुटुंबियांना देखील सांगितलं, आरोपींला मुलीच्या कुटूंबाने बोलावले असता त्याने उलट त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आहे.
अश्लील फोटो पाठवून मुलींना द्यायचा त्रास
मुलीच्या कुटुंबाने सांगून देखील आरोपीने मुलीला अश्लील संदेश पाठविणे थांबवले नाही. फोटोग्राफरने या मुलीला फोन करुन देखील त्रास दिला आणि तिच्यावर भेटण्यासाठी दबाव आणला. अखेर त्रस्त मुलीने गोविंदगड पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याच वेळी पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला ताब्यात घेतलं आहे.