नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणात काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांना हसण्यावरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे.
हा प्रकार राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा होत असताना पंतप्रधान उत्तर देत होते. दरम्यान सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी रेणुका चौधरी यांना हसण्यावरून रोखले आणि सांगितले की पंतप्रधानांच्या भाषणावेळी अशी वर्तणूक करणे व्यवहार्य नाही. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले की रेणुका चौधरींना अशा प्रकारची वागणूक न करण्यास सांगावे, नाही तर मी कारवाई करेल. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रेणुका जींना काहीच नका बोलू कारण रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा अशा प्रकारचे हसणे ऐकले आहे.
#WATCH Congress MP Renuka Chowdhury speaks on PM Narendra Modi's comment on her laughter in Rajya Sabha pic.twitter.com/9ZwBdM5Eiq
— ANI (@ANI) February 7, 2018
पंतप्रधानांच्या या तिखट टिप्पणीनंतर संसदेत सत्ता आणि विरोध पक्षांच्या सदस्यांमध्ये हास्याचे फवारे उडाले. पण यावर रेणुका चौधरी काही तरी म्हणत होत्या, पण हास्यामुळे त्यांचा आवाज ऐकू आला नाही.
यानंतर रेणुका चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोदी यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. त्यांच्याकडून यापेत्रा आणखी काय अपेक्षा करू शकतो. ते ज्या थराला जाऊन बोलतात त्या थराला जाऊन मी बोलू शकत नाही. असे बोलून त्यांनी महिलांचा अपमान केला आहे.