PM Modi On Israel Iran War : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव (Iran-Israel Conflict) गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. अशातच आत इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यामुळे आता पश्चिम आशियामध्ये युद्धाची गांभिर्याता आणखी वाढली आहे. अशातच आता भारतात निवडणूक प्रचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जगात युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला मजबूत सरकारची गरज असल्याचं मत नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
तुम्ही पाहताय जगात युद्धाची परिस्थिती आहे. जर जगात अशी परिस्थिती असेल तर भारतात युद्धपातळीवर काम करणारी सरकार गरजेची आहे. अशा वेळी मजबूत सरकार असायला हवी. भारताचं रक्षण करणारं सरकार असणं आवश्यक आहे. त्यामुळे असं काम फक्त पूर्ण बहुमत असणारी भाजपची सरकारच करू शकते, असं मोदींनी म्हटलं आहे. जगातील अनेक देशांची परिस्थिती वाईट आहे. आपला एक शेजारी देश जो दहशतवाद्यांचा व्यापार करायचा, तो आता गव्हाच्या व्यापारामुळे त्रस्त झालाय, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा लगावला. अशा परिस्थितीत आपला भारत जगामध्ये सर्वाधिक तेजीत वाढत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
ईरान-इजरायल युद्ध पर पीएम मोदी का बयान, कहा- दुनिया में आज युद्ध का माहौल है, भारत में मजबूत सरकार की जरूरत'#PMModi #IsraelIranConflict #Israel #Iran pic.twitter.com/GsiNGkbBgB
— Zee News (@ZeeNews) April 19, 2024
इराणवर एअर स्ट्राईक
इस्रायलनं इराणवर एअर स्ट्राईक केलाय. इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर मिसाईलचा हल्ला चढवला आहे. अमेरिकेनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या इस्फहान शहरात स्फोटाचा जबरदस्त आवाज ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे इस्फाहन शहरात अनेक न्यूक्लिअर साईट आहेत. त्याशिवाय तबरेज शहरातही स्फोटाचे आवाज जाणवले. त्यामुळे इराणमध्ये एकच खळबळ उडालीये. या आधी इराणने इस्रायलच्या दिशेने ड्रोन डागले होते. त्याचा बदला इस्रायलनं आज घेतला. इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. खामेनेई यांच्या वाढदिवशीच इस्रायलने हल्ला केल्यानं इराणला मोठा धक्का बसलाय.
मोदींचा पुणे दौरा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यात होण्याची शक्यता आहे.. 29 एप्रिल रोजी मोदींची सभा होऊ शकते.. पुण्याच्या एस.पी. कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत.. पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे प्रयत्न सुरु आहेत.