पंतप्रधान मोदींकडून काश्मीरच्या केसरचे कौतुक, जाणून घ्या काय आहेत फायदे

पंतप्रधानांचा 'मन की बात'मध्ये काश्मीरच्या केसरचा उल्लेख

Updated: Dec 27, 2020, 04:41 PM IST
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरच्या केसरचे कौतुक, जाणून घ्या काय आहेत फायदे title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून जनतेला संबोधित करताना काश्मीरच्या केसरचा उल्लेख केला. अबुल फजलची कहाणी सांगताना त्यांनी काश्मीरच्या केसरचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, अकबराच्या दरबारातील प्रमुख सदस्य अबुल फजल होते. एकदा काश्मीरच्या भेटीनंतर ते म्हणाले की काश्मीरमध्ये असे दृश्य आहे, जे पाहून चिडलेला आणि संतप्त माणूसही आनंदी होईल. शतकांपासून केशर काश्मीरशी जुडलेले आहे. काश्मीर केशर प्रामुख्याने पुलवामा, बुडगाम, किश्तवाड अशा ठिकाणी उत्पादन होतं. पीएम मोदी म्हणाले की, यावर्षी मे महिन्यात काश्मीर केसरला जीआय टॅग देण्यात आला होता. या माध्यमातून आम्हाला काश्मीरच्या केसरला आंतरराष्ट्रीय ब्रांड बनवायचा आहे.

मन की बात (Man Ki baat) कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीर केशर (Kashmir kesar) हा मसाला म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. ज्यात अनेक प्रकारची औषधी गुणधर्म आहेत. हे खूप सुवासिक आहे, त्याचा रंग गडद आहे आणि त्याचे धागे लांब व जाड असतात. ज्यामुळे त्याचे औषधी मूल्य वाढते. हे जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करते. गुणवत्तेच्या बाबतीत सांगायचे झाले तर काश्मीरचे केसर इतर देशांच्या केसरपेक्षा अगदी वेगळे आहे. आय टॅगमधून काश्मीरमधील केशरला वेगळी ओळख मिळाली आहे.

पीएम मोदी म्हणाले की, जीआय टॅग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे दुबईतील सुपर मार्केटमध्ये बाजारात आणले गेले हे पाहून तुम्हाला आनंद होईल. आता त्याची निर्यात वाढू लागली आहे. यामुळे स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल. याचा विशेष करून केसर उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

केशरचे फायदे -

- केशरमधील मॅंगनीज शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

- केशर हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यातील काही खनिजे आणि सेंद्रिय संयुगे कॅल्शियमची कमतरता दूर करण्यात मदत करतात.

- केशर वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. केशर दातदुखीला मुक्त करते.

- खराब पोट आणि पोट फुगण्याच्या उपचारात देखील ते वापरले जाते. केशराचा उपयोग बद्धकोष्ठता आणि सूज दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.

- एखादा किडा चावल्यास त्या जागी केशर लावले जाते.