समुद्र पाहिला आणि मोह आवरलाचं नाही... पुण्यातील पर्यटकांचा सिंधुदुर्गमध्ये मृत्यू

पुण्यातील पर्यटकांचा कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मृत्यू झाला आहे.

वनिता कांबळे | Updated: Feb 22, 2025, 04:43 PM IST
समुद्र पाहिला आणि मोह आवरलाचं नाही... पुण्यातील पर्यटकांचा सिंधुदुर्गमध्ये मृत्यू

Sindhudurg Tarkarli Beach : मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्‍यावर (Tarkarli Beach) एक विचित्र घटना घडली आहे. समुद्रात पोहण्याचा मोह पर्यटकांच्या जीवार बेतला आहे. सिंधुदुर्गच्या मालवण मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पाच पर्यटक बुडाले यात दोघांचा मृत्यू झाला आहे. समुद्राचा आनंद लुटताना खबरदारी घतेली पाहिजे असा सूचना वारंवार केल्या जातात. मात्र, बेजाबदारपमा पर्यटकांच्या अंगाशी आला आहे.  

मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्‍यावर फिकण्यासाठी आलेले पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते.  त्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.  स्थानिकांनी पाच पर्यटकांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे.  दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेेत.

शुभम सुशील सोनवणे आणि  रोहित बाळासाहेब कोळी अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. दोघेही पुण्यातील हडपसर परिसरात राहणारे आहेत. तर,  ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी मृत तरुण आपल्या मित्रांसह समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत होते.  यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे हे तरुण समुद्रात बुडाले.  खोल समुद्रात जाऊ नये अस स्थानिकांनी सागून देखील पर्यटक खोल समुद्रात गेल्याने दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.  

समुद्राखालील सौंदर्य कृत्रिमरीत्या युद्धनौकेवर साकारण्यात येणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग विजयदुर्ग किल्ल्याजवळ उभारण्यात येणार असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्याची तयारी सुरू केली आहे. हा जवळपास २० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, सध्या त्याचा पर्यावरणीय अभ्यास सुरू आहे.