मुंबई : सर्वसामान्य लोकांमधून उद्योग क्षेत्रात पदार्पण केल्याने अनेजण आज मोठे उद्योगपती बनले आहेत. आपणही बिझनेसकरुन उद्योग क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण करावं अस अनेकांच स्वप्न असतं. हे स्वप्न पुर्ण केल्याने देशाचा आणि त्या व्यक्तीचा दोघांचाही फायदा होतो. बिझनेस करणारी व्यक्ती श्रीमंत होते आणि त्या बिझनेसमुळे देशाला टॅक्स मिळतो. त्यासोबतच, नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जेत वाढ होते आणि रोजगाराची निर्मितीसुद्धा होतो. यासर्व बाबींचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri MUDRA Yojana) राबवली जातीये.
मुद्रा योजनेमध्ये तीन प्रकारचे कर्ज दिले जातात.
शिशु कर्ज: शिशु कर्जाअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.
किशोर कर्ज: 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर कर्जाअंतर्गत दिलं जातं.
तरुण कर्जे: तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाखांपर्यंतची कर्ज देण्यात येतं.
- बँकेला किंवा NBFC ला कोणतीही सिक्योरिटी जमा करण्याची आवश्यकता नसते.
- कमी किंवा शुन्य प्रोसेसिंग फीस आणि कमी व्याज दर
- महिला उद्योगजकांना व्याज दरांमध्ये सूट मिळते.
- टर्म लोन, वर्किंग कॅपीटल लोन आणि ओवरड्राफ्ट सुविधांच्या स्वरुपात वापरलं जाऊ शकतं.
- सर्व नॉन-फार्म एंटरप्राईजेस म्हणजेच स्मॉल किंवा मायक्रो कंपन्यांना मुद्रा लोन मिळू शकतं.
- अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/अल्पसंख्यांक कॅटेगरीचं कर्ज विशेष व्याज दरांमध्ये मिळू शकतं.