Qatar Death Penalty To 8 Former Indian Navy Men: मुस्लिम ब्रदरहुड संघटनेमधील हमासचं युद्ध इस्रायलविरुद्ध सुरु आहे. या दोघांमधील वाद तसा फार जुना आहे. मात्र सध्या दोन्ही गटांमध्ये ज्या पद्धतीने वाद सुरु आहे त्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. इराण, कतार आणि अन्य देशांच्या पाठींब्यामुळे हमासला बळ मिळालं आहे. हमासला पाठिंबा देणाऱ्या देशांचे अनेक प्रतिनिधी कतारमध्ये सध्या असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सध्या हमासमध्ये असलेला अन्य एक देश म्हणजे पाकिस्तानी. पाकिस्तान अनेकदा या देशांबरोबर भारताचे संबंध अधिक कटू व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहिल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये सापडतील. सध्या भारताच्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारने फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता यामागेही पाकिस्तानचा कट तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मध्य आशिया आणि पाकिस्तानसंदर्भातील प्रकरणांचे जाणकार असलेल्या कमर आगा साहब यांनी दिलेल्या माहितीनुसार कतारने भारतीयांनी फाशी देण्याचा घेतलेल्या निर्णयामागे पाकिस्तानचा मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे. कतारमध्ये राहणारे पाकिस्तानी लष्करातील निवृत्ती अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रभाव कतारच्या निर्णयांवर फार खोलपर्यंत असणार असंही सांगितलं जात आहे.
17 वर्षांनंतर 2020 मध्ये एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 3 वर्षांच्या आत 8 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांविरोधात जो कथित हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आला आहे त्याची शिक्षा म्हणून मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे. मात्र यासंदर्भातील माहिती कतारने भारताबरोबर शेअर केलेली नाही. कमर आगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि कतारचे संबंध चांगले आहेत. मात्र मुस्लिम ब्रदर हूडला डावलून भारताला प्राधान्य देण्याइतके हे संबंध दृढ नाहीत. याचाच पाकिस्तान फायदा घेत आहे.
कतारमध्ये 8 लाख भारतीय राहतात. 15000 लहान मोठ्या भारतीय कंपन्या कतारमधून काम करतात. यामध्ये बांधकाम, कम्युनिकेशन, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रात काम करतात. भारत आणि कतारदरम्यान व्यापारी संबंध सन 2021-22 मध्ये 15.03 बिलिअन अमेरिकी डॉलर्स इथका होता. यामध्ये 1.83 बिलिअन डॉलर्सचा वाटा हा डाळ, कॉपर आर्यन स्टीलच्या वस्तूंबरोबरच फळ, भाज्या, मसाले, तयार खाद्य पदार्थ, इलेक्ट्रीक वस्तू, मशीन, बांधकामासंदर्भातील सामना, कापड, रसानये, रबर, मौल्यवान खड्यांचं निर्यात होतं. तर 13.19 बिलिअन डॉलर्सचं एलएनजी, पीएनजी, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, खतं, प्लास्टिक आणि अॅल्यूमिनियमची आयात केली जाते.
भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये दोघांचीही बाजू घेतली आहे. भारताने टू स्टेट फॉर्म्युल्यावर जोर देण्याची भूमिका घेतली आहे. कोणत्याही दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून जबरदस्तीने प्रांतावर ताबा सांगू नये असं म्हणत भारताने हमाससंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. दुसरीकडे बुचर ऑफ पॅलेस्टाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज दिला आहे. सौदी अरबिया, इजिप्त, यमन, युएई आणि बहरीनने कतारबरोबर आपले संबंध 2017 साली संपवले होते. तेव्हा पाकिस्तानने या देशांबरोबर चांगले संबंध हवेत म्हणून कतारबरोबरचं नातं संपवलं होतं. पाकिस्तान आता पॅलेस्टाईनबरोबर उभं राहत असल्याची भूमिका मांडत कतारच्या नजरेत आपली प्रतिमा सुधरवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताच्या ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामध्ये कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेन्दु तिवारी, कमांडर सुग्राकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश यांचा समावेश आहे. दरम्यान या शिक्षेच्या सुनावणीमागील इस्रायल कनेक्शन समोर आलं आहे.
'अलजजीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कतारमधील तुरुंगात कैद असलेल्या या 8 भारतीयांवर इस्रायसाठी हेरगिरी करण्याचा ठपका ठेवण्यात आला. या आरोपांनुसार कतारमध्ये पाणबुड्यांसंदर्भातील प्रोजेक्टबद्दलची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी इस्रायलला दिली आहे. हे सर्व भारतीय कर्मचारी दहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज अॅण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीसाठी काम करायचे. ही कंपनी कतारला पाणबुड्यांसंदर्भातील तंत्रज्ञानाबद्दलची प्रमुख सल्लागार कंपनी आहे. या कंपनीच्या मदतीने रडारपासून वाचणाऱ्या पाणबुड्या बनवण्याचा कतारचा प्रयत्न सुरु आहे.
करताने नौदलाचा तळ निर्माण करुन आपल्या नौदलाच्या वाढीच्या दृष्टीने पाणबुड्यांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने जहाज निर्मिती करणाऱ्या फिनकॅटिएरी एसपीए या कंपनीबरोबर काही करार केले होते. हे करार 2020 साली करण्यात आली होते. मात्र याअंतर्गत निर्मिती सुरु करण्यात आली नाही. कतार आणि इटलीदरम्यान पाणबुड्यांसंदर्भातील एक करार होणार होता. याचबद्दलची माहिती भारतीयांनी इस्रायलला दिल्याचा आरोप केला जात आहे.
हे 8 भारतीय ज्या दहरा ग्लोबल टेक्नोलॉजीज अॅण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेस कंपनीमध्ये काम करत होते ती ओमानमधील रॉयल ओमानी (ओमानच्या वायूसेनेमधून सेवानिवृत्त झालेल्या स्क्वाड्रन लीडरच्या) मालकीची कंपनी आहे. ही कंपनी सुरक्षा क्षेत्रात कार्यरत आहे.