Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. एकूण 6700 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. अशातच या यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. या हल्ल्यातच राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने (Rahul Gandhi Car) अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का? यावर स्वत: काँग्रेसने उत्तर दिलंय.
काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट करत व्हायरल माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. 'पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय आला होता. या गर्दीत राहुल गांधींना भेटण्यासाठी अचानक एक महिला त्यांच्या कार समोर आली, त्यामुळे अचानक ब्रेक लागला. त्यानंतर सुरक्षा वर्तुळात वापरलेल्या दोरीमुळे गाडीची काच फुटली', अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
गलत खबर को लेकर स्पष्टीकरण
पश्चिम बंगाल के मालदा में राहुल जी से मिलने अपार जनसमूह आया था। इस भीड़ में एक महिला राहुल जी से मिलने अचानक उनकी कार के आगे आ गई, इस वजह से अचानक ब्रेक लगाई गई।
तभी सुरक्षा घेरे में इस्तेमाल किए जाने वाले रस्से से कार का शीशा टूट गया।
जननायक…
— Congress (@INCIndia) January 31, 2024
राहुल गांधी जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायासाठी लढा देत आहेत. जनता त्यांच्यासोबत आहे, जनता त्यांना सुरक्षित ठेवत आहे, असं म्हणत काँग्रेसने भाजपला कोपरखळी मारली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी पूर्णियाला पोहोचली होती. बिहारमधील अररियानंतर दुसऱ्या दिवशी पूर्णियात पोहोचलेल्या त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी राहुल गांधी बिहारी स्टाईलमध्ये दिसले. त्यांनी डोक्याला टॉवेल गुंडाळल्याचं दिसून आलं. मल्ल्या आणि अदानी यांची कर्जे माफ करता येतात, पण शेतकऱ्यांची कर्जे माफ करता येत नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला.
दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महत्त्व कमी करण्यासाठी नितीश कुमार यांन टायमिंग जुळवलं, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जातीये.