नवी दिल्ली : जेव्हा तुम्ही विमान तिकीट काढता त्यावेळी तुमच्या समोर किती जागा, कोणते गेट याची माहिती मिळते. तसेच याची माहिती तुमच्या मोबाईलवरही येते. तसेच मेलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येते. म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टींची अपडेट माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळते. आता हीच सुविधा तुम्हाला रेल्वे तिकीट काढताना मिळणार आहे. रेल्वेचे आरक्षण करताना तुम्हाला तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर विमानाप्रमाणे माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण करताना कोणती सीट उपलब्ध आहे. किती जागा शिल्लक आहे, याची माहिती रेल्वेचे तिकीट आरक्षण करताना तुम्ही पाहू शकणार आहात.
ही सुविधा विकसित करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही सुविधा सुरु करण्यासाठी यावर काम करण्याच्या सूचना केल्यात. रेल्वे मंत्र्यानी सांगितले की, विमान तिकीटाचे आरक्षण करताना ज्याप्रमाणे तिकीट बुकिंगची माहिती तुमच्या समोर संगणक स्क्रीनवर येते. त्याप्रमाणे रेल्वेचे तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना मिळाली पाहिजे. विमान सेवेची जी पद्धत आहे. त्याप्रमाणे रेल्वेची पद्धत असावी. या सिस्टिमवर काम करण्याचा सल्ला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलाय. ही सुविधा करणे अवघड आहे. मात्र, हे काम अशक्य असे नाही. त्यामुळे भविष्यात ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
या व्यवस्थेला थोडा वेळ लागले. मात्र, रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, रेल्वे तिकिटाबाबतची माहिती, जागेची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. तिकिटाबाबतची संपूर्ण माहिती मिळेल आणि ती अपडेट असेल. मात्र, एखाद्याची माहिती लिक होऊ नये म्हणून तुमचा पीएनआर नंबरचा उल्लेख केला जाईल.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी हे काम कठिण आहे. मात्र, अशक्य असे काहीही नाही. ही सुविधा उपलब्ध करुन देण्यास थोडा वेळ जाईल. कारण रेल्वेला अनेक ठिकाणी थांबे असतात. त्यामुळे प्रवासी हे त्या थांब्यावर चढत-उतर असतात. त्यामुळे तक्ता तयार करताना अडचन येवू शकते. मात्र, यावर काम करणे शक्य आहे. जरी हे काम कठिण असले तरी अशक्य असे काहीही नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.