RBI Policy : रिझर्व्ह बँंकेचे पतधोरण । होम लोन स्वस्त होणार नाही, शेअर बाजारात तेजी

RBI Monetary Policy 2021 Update : सध्या कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँंकेच्या पतधोरणाकडे (RBI Monetary Policy) लक्ष लागले होते. 

Updated: Apr 7, 2021, 01:35 PM IST
RBI Policy : रिझर्व्ह बँंकेचे पतधोरण । होम लोन स्वस्त होणार नाही, शेअर बाजारात तेजी  title=

 मुंबई : RBI Monetary Policy 2021 Update : सध्या कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँंकेच्या पतधोरणाकडे (RBI Monetary Policy) लक्ष लागले होते. त्यामुळे आरबीआय काय निर्णय घेते याची जास्त उत्सुकता होती. कोरोना रुग्णवाढीत झालेली वाढ  आणि त्यामुळे आर्थिक विकासला होणार अडथळा लक्षात घेता होम लोनबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची भीती जास्त असल्याने नव्याने घातलेले निर्बंध विकासाला मारक ठरतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने आज पतधोरण जाहीर करताना व्याजदर आहे तसेच  ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता होती, मात्र तूर्त व्याजदर कायम ठेवत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

 तुमचे गृहकर्ज आणि कार कर्जावरील ईएमआय कमी होणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी समितीने व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. एमपीसीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की एमपीसीच्या सर्व सदस्यांनी व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर 4 टक्केच ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये Cash Reserve Ratio (CRR) 3.35 टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कर्ज घेतल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढाव्यात बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर 5 टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मान्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. 2020-2021 या वर्षात भारताचा विकास दर 10.5 टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे, ज्याचा परिणाम वाढीच्या वसुलीवर परिणाम होऊ शकतो. शेअर बाजाराच्या धोरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक घोषणेचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे.