मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभागात (India Post Recruitment 2021) 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी विविध पदांसाठी पदभरती केली जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेशिवाय ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्ट विभागाने पंजाब पोस्टल सर्कलसाठी ही भरती आहे. यानुसार पोस्टल असिस्टेंट, सॉर्टिंग असिस्टेंट, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी भरती आहे. (Recruitment in Indian Post Department for 10th and 12th pass candidates without exam know the details)
अर्ज कसा करायचा?
इच्छुक उमेदवार या भरतीसंदर्भात अधिक माहिती https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx या लिंकवर जाऊन जाणून घेऊ शकतात. या पदासांठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 18 ऑगस्ट आहे. विशेष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
इच्छुक तरुण तरुणी https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_09072021_Punjab.pdf या लिंकद्वारे अधिक सविस्तर जाणून घेऊ शकतात. एकूण 57 रिक्त जागांसाठी ही पदभरती असणार आहे. तसेच शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा, असं आवाहन संबंधित विभागाद्वारे करण्यात आलंय. अनेकदा काही इच्छूक उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज करतात. त्यामुळे वेबसाईटवर जोर येतो. परिणामी अर्ज भरता येत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागू नये, म्हणून हे आवाहन करण्यात आलंय.
पदनिहाय किती जागा?
पोस्टल असिस्टेंट - 45 पद
सॉर्टिंग असिस्टेंट - 9 पद
मल्टी टास्किंग स्टाफ - 3 जागा
अटी काय आहेत?
पोस्टल असिस्टेंट या सॉर्टिंग असिस्टेंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12वी पास असावा. उमेदवाराने सर्टिफाईड बेसिक कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा. तसेच मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा तरुण हा किमान 10 वी पास किंवा समकक्ष असावा. तसेच उमेदवाराला संबंधित राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषेचं ज्ञान असावं.
कोणत्या पदासाठी वयोमर्यादा किती?
पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट - 18 ते 27 वर्ष
मल्टी टास्किंग असिस्टेंट - 18 ते 25 वर्ष
पगार किती?
पोस्टल असिस्टेंट आणि सॉर्टिंग असिस्टेंट | 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये.
मल्टी टास्किंग असिस्टेंट | 18 हजार ते 56 हजार 900 रुपये.