गंगेचे पाणी कधीच खराब का होत नाही? अखेर संशोधकांना सापडलं उत्तर, ही 3 तत्व...

Ganga Water: गंगा नदीच्या पाण्यात असे तीन तत्व आढळतात ज्यामुळं नदीचे पाणी स्वच्छ राहते आणि प्रदुषणही होत नाही. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 5, 2025, 07:22 AM IST
गंगेचे पाणी कधीच खराब का होत नाही? अखेर संशोधकांना सापडलं उत्तर, ही 3 तत्व...  title=
research on Ganga water remains clean because of three elements

Ganga Water: गंगा नदी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. गंगा नदीला धार्मिक महत्त्वदेखील आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये गंगा नदीचा उल्लेख सापडतो. गंगा जल हिंदू धर्मीयांसाठी खूप पवित्र आहे. गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. दरवर्षी गंगेत स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहेत. मात्र तरीही गंगेचे पाणी कधीच खराब का होत नाही? या विषयावर गेले काही दिवस संशोधन सुरू होतं. अखेर याचं उत्तर सापडलं आहे. 

गंगेचे उगमस्थान हिमालय आहे. गंगोत्री हे अनेक भाविकांचे पूजास्थान आहे. गंगेचे पाणी कित्येक महिने साठवून ठेवता येते. ते कधीच खराब होत नाही. इतकंच नव्हे तर, धार्मिक सणांच्या दिवशी दररोज लाखो भाविक गंगेत स्नान करतात. सध्या महाकुंभ मेळावा सुरू आहे. करोडो भाविक गंगेत अमृतस्नानासाठी येतात. मात्र तरीही कधीच या पाण्यातून महामारी किंवा आजाराचा संसर्ग होत आहे. गंगेच्या पाण्यात अशी तीन तत्व असतात यामुळं गंगेचे पाणी स्वच्छ राहते. 

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान (national institute of environmental engineering and research) ने केलेल्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधन केले आहे. यात समोर आलंय की, गंगेच्या पाण्यातच असे गुण असतात जे स्वतःच पाणी स्वच्छ करतात. गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात बॅफ्टीरियोफेज असतात. जे गंगेत प्रदूषण होण्यापासून बचाव करतात. हा संशोधन स्वच्छ गंगा मिशनअंतर्गंत NIRI चे शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. या संधोधनासाठी तीन टप्प्यात गंगा नदीची विभागणी करण्यात आली आहे. यातील पहिला गोमुख हरिद्वार, दुसरा हरिद्वार ते पटणा आणि तिसरा पटणा ते गंगासागर असं आहे. 

डॉ. कृष्णा खैरनार यांच्या रिसर्चनुसार, संशोधकांनी 50 वेगवेगळ्या ठिकाणाचे गंगा जल, नदीच्या तळाशी असलेली रेती आणि मातीचे सँपल घेतले आहेत. गंगा नदीत स्वतःलाच शुद्ध ठेवणारे गुण आहेत. संशोधकांनी कुंभ मेळेच्या दरम्यान सँपल एकत्र केले आहेत. गंगा जलमध्ये बॅक्टरियोफेज आढळून आले आहेत. जे पाण्यात किटाणु नष्ट करतात. 

गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा अधिक असते. गंगा जलमध्ये ऑक्सिजनचा स्तर 20 मिलीग्रॅम प्रती लीटरपर्यंत आढळून आले आहे. त्याचबरोबर टेरपिन नावाचे एक फाइटोकेमिलदेखील आढळून आले आहेत. हे तीन तत्व गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात. खैरनार यांनी म्हटलं आहे की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. गंगा नदीच्या पाण्यातील हे तत्व भारतातील अनेक नद्यांमध्ये आहेत. त्यामुळं यमुना आणि नर्मदा नदीच्या पाण्यावरदेखील रिसर्च करण्यात आला आहे. मात्र या नद्यांमध्ये या तत्वांचे प्रमाण खूपच कमी आहे.