'आई मला माफ कर, माझ्यानंतर माझा चेहरा...', पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कंटाळून तरुणाने उचचलं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे रोहित सैनी नावाच्या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. चिठ्ठीत त्याने पत्नी आणि सासरच्यांना यासाठी जबाबदार धरलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2025, 10:34 PM IST
'आई मला माफ कर, माझ्यानंतर माझा चेहरा...', पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कंटाळून तरुणाने उचचलं टोकाचं पाऊल title=

उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे रोहित सैनी नावाच्या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कंटाळून जीवन संपवलं आहे. गळफास घेत त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली आहे. यामध्ये त्याने लिहिलं होतं की, "आई मला माफ कर. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला अजिबात दाखवू नको. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी आणि तिचं कुटुंबच जबाबदार आहे".

मिळालेल्या माहितीनुसा, रोहित सैनीचं लग्न चांदपूर क्षेत्रातील गाव नैपुरा येथील प्रितीशी झालं होतं. त्यांच्या लग्नाला 13 महिने झाले होते. पण लग्न झाल्यापासूनच दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. याच वादातून रोहितच्या पत्नी विषारी पदार्थ खाण्याचं नाटक केलं होतं. रोहितने तिच्यावर उपचार केले होते. पण त्यानंतर रोहितची पत्नी प्रिती सतत त्याला त्रास देत होती आणि वेगळं राहण्याची तयारी करत होती. 

वेगळं होण्याच्या बदल्यात प्रितीचे कुटुंबीय रोहित सैनीकडे 10 लाखांची मागणी करत होते. यालाच कंटाळून रोहित सैनीने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. रोहित सैनीने आपल्या घऱात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्याने आपल्या आईच्या नावे एक सुसाईड नोट लिहून ठेवली. यामध्ये त्याने लिहिलं होतं की, , "आई मला माफ कर. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला अजिबात दाखवू नको. माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी आणि तिचं कुटुंबच जबाबदार आहे".

रोहित सैनीने लिहिलेली सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबात खळबळ माजली आहे. रोहित आपल्या आईचा एकमेव आधार होती. आजारपणातून काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याला दोन बहिणी आहेत, ज्यांचं लग्न झालं आहे. 

रोहितला चार महिन्यांचं बाळही आहे, ज्याला पत्नी आपल्यासोबत सासरी घेऊन गेली होती. रोहितच्या आईने आपल्या मुलाचा थळ केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच चार महिन्याच्या बाळाला आपल्याकडे सोपवलं जावं अशी मागणी केली आहे.