भारतात कुठेही फिरा, सर्व महामार्गावर टोलचा एकच रेट फिक्स राहणार? नितीन गडकरींची माहिती

Nitin Gadkari : महामार्गांवरील टोल कमी होण्याचे  संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सरकार एकसमान टोल धोरणावर काम करत असल्याची माहिती  गडकरींनी दिली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 4, 2025, 07:33 PM IST
भारतात कुठेही फिरा, सर्व महामार्गावर टोलचा एकच रेट फिक्स राहणार?  नितीन गडकरींची माहिती title=

Nitin Gadkari On TOll Tax Reform : देशभरात महामार्गांचे जाळे पसरले आहे. महामार्गांमुळे प्रवाशांसा प्रवास सुखद आणि जलद झाला आहे. या महामार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांना टोल भरावा लागतो. विविध राज्यात टोलचे शुल्क हे वेगवेगळे असते. वेग वेगळ्या ठिकाणी टोलचा दर हा कमी जास्त असतो. यामुळेच लांबा पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना हजारो रुपयांचा टोल भरावा लागतो. आता मात्र, प्रवासादर्मायन टोल भरताना प्रवाशांचा गोधळ होणार नाही. भारतात कुठेही फिरा, सर्व महामार्गावर एकसमान टोल आकारला जाणार आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याचे संकेत दिले आहेत.

हे देखील वाचा... मुंबई गोवा हायवेसह कोकणात जाणारा आणखी एक सुपरफास्ट महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडणार; नेमका काय आहे प्लान?

खराब रस्ते आणि जास्त टोल आकारणी यामुळे देशातील प्रवासी त्रस्त झाले आहेत.  खराब रस्त्यांच्या तक्रारींमुळे राष्ट्रीय महामार्गांबाबत नागरिकांची नाराजी वाढत आहे. याबाबत मंत्री नितीन गडकरी यांनी यांना एका मुलखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी महामार्गांवरील टोल कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रीय महामार्गांवर अडथळारहित जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीवर आधारित टोल संकलन प्रणाली  (GNSS) लागू करण्याच्या अनुषांगे प्रयत्न सुरु आहेत. कर सवलतीनंतर आता टोलवरही मदत योजना आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सरकार लवकरच अशी योजना आणणार आहे ज्यामुळे वाहनचालकांना टोलवर मोठी सवलत मिळेल. या योजनेमुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल  असे नितीन गडकरी म्हणाले. मात्र. ही योजना नेमकी काय असेल याचा खुलासा  नितीन गडकरी यांनी केलेला नाही. टोल रद्द केला जाईल की कमी केला जाईल या प्रश्नावर गडकरी यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.