Knowledge Conclave of GACS in Mumbai : ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस अर्थात GACS चे नॉलेज कॉनक्लेव्ह नुकतेच मुंबईत पार पडले. यामध्ये विविध क्षेत्रातील 200 पेक्षा अधिक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. तसेच आप-आपल्या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आणि विचार व्यक्त केले.
नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त के एल प्रसाद या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कॉरपोरेट सुरक्षेवर आपले विचार व्यक्त केले. तर कॅप्टन अंबरीश पुरोहित यांनी मुख्य वक्ता म्हणून या ठिकाणी हजेरी लावली. विविध क्षेत्रातील बिझनेस लीडर्स आणि प्रसिद्ध व्यक्तींनीही यात आवर्जून सहभाग नोंदविला.
ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट सर्व्हिसेस (GACS) देशभरातील प्रमुख कॉर्पोरेट क्षेत्रांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करत असते. अशा कॉनक्लेव्हच्या माध्यमातून कॉर्पोरेट लीडर्स एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान करतात. तसेच कॉर्पोरेटमध्ये सध्याचे ट्रेंड्स, आव्हान आणि नाविन्य यावर चर्चा केली जाते. अशाच कार्यक्रमांमधून कॉर्पोरेट क्षेत्रांसमोर येणाऱ्या आव्हानांना तोंड कसे द्यावे हे या ठिकाणी आप-आपल्या अनुभवातून सांगितले जाते. आज या संघटनेचे देशभरात 10 हजारपेक्षा अधिक सदस्य आहेत.